कळंब (प्रतिनिधी)- प्रतिवर्ष प्रमाणे या ही वर्षी संतशिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची 400 वी जयंती 8डिसेंबर रविवार रोजी तेली समाज सेवाभावी संघाच्या वतीने साई मंगल सेवेच्या समोर लक्ष्मी(ढोकी)रोड कळंब येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पुजन वआरती लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र आबा मुंडे, लक्ष्मण फल्ले, सागर मुंडे, डॉ. सुनील थळकरी शिशिर राजमाने,यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमास अध्यक्ष अशोक चिंचकर, शिवाजी लोखंडे, विश्वंभर किरवे ,निलेश होनराव, बाळासाहेब कथले , त्रिंबक कचरे ,बाळकृष्ण गुरसाळे अश्रुबा शेवते संजय चिंचकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत.यांनी संतशिरोमणी संताजीं जगनाडे महाराज यांच्या जिवन कार्यावर विचार व्यक्त केले. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या कुटुंबात वारकरी परंपरा असल्याने त्यांच्यावर लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले. वयाच्या सोहळ्याव्या वर्षी ते संत तुकाराम महाराज यांच्या संपर्कात आले.तसेच ते पुढील काळात संत तुकाराम महाराज यांच्या प्रमुख टाळकरीं पैकी एक बनले. त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग-ओवी मुखोद्गत केलेली होती.समाज कंठकांनी गाथा इंद्रायणी नदीच्या डोहात बुडविल्या नंतर संतजगनाडे महाराजांनी पूर्नलिखान करून संत तुकाराम महाराजांची गाथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले.व तसेच त्यांनी स्वतःविपूल प्रमाणात अभंग रचना केली आहे. तेलघाण्याचे अभंग लिहीले.
आमुचा तो घाणा|त्रिगुण तिळाचा॥
नंदी जोडीयाला | मन पवनाचा ॥
असे सांगून माधवसिंग राजपूत यांनी संताजी महाराज जगनाडे यांचे विचार व कार्य पाहिजे तेवढ्या प्रमाणात लोकापर्यंत पोहोचलेले नाही जयंती उत्सवाच्या माध्यमातून हे काम कळंब तेली समाज सेवाभावी संघ करीत आहे असे सांगितले तर विलास आप्पा मिटकरी यांनी संतांनी सांगितलेले विचार व दाखवलेला मार्गावरून चालल्यास समाजाचे हित आहे असे सांगितले. या कार्यक्रमात शैलेश स्वामी, किरण फल्ले,कैलास बागल ,संदीप शेवते, नाना थळकरी, दत्ता शेवडे,नाना शिंगणापूरे, ,मच्छिंद्र साखरे,अशोक फल्ले,परशुराम देशमाने, दीपक जाधव,रामलिंग कानडे,मनोज फल्ले.गणेश शेवते,सोमनाथ देशमाने, शिवराज पाटील,महारुद्र हुंडेकरी, कुमार किरवे, बालाजी बागल, ओंकार कलशेट्टी, बालाजी देशमाने,अनिल खराडे, पिराजी देशमाने,महारुद्र नक्षे, संजय मुंडे, परशुराम देशमाने, गजानन मुंडे, अशोक फल्ले, शहाजी कानडे, दत्ता किरवे,संतोष शेवते, संदीप शेवते, उत्तरेश्वर देशमाने, गोकुळ बरकसे, नारायण क्षिरसागर, ओंकार कलशेट्टी, बालाजी वांकर,यांचा सहभाग होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अशोक चिंचकर यांनी केले.