तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत विधानसभा निवडणुक पुर्वी व निकाल नंतर ही वीजेची बोबाबाबोंब सुरुच आहे.
याचा वीजेच्या खेळखंडोबाचा फटका व्यवसायीक व्यापारी भाविक स्थानिकांना बसत आहे. महावितरण कारभार यामुळे चव्हाट्यावर आला असुन महावितरण कार्यालयावर कुणाचाही वचक दिसत नसल्याने अधिकारी वर्गाची मनमानी वाढली आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर येथील महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा बोलबोला देशभरातुन देविदर्शर्ना आलेल्या भाविकांना विजखेळखंडोबा अनुभवा वरुन देशभरात झाला आहे. हिंदू देवतेच्या पविञ धार्मिक स्थळी वीजेचा खेळखंडोबामुळे तिर्थक्षेञ तुळजापूर ची बदनामी होत असल्याची चर्चा आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर येथील वीजपुरवठा कधी खंडीत होईल हे सांगता येत नाही. महावितरण कडुन वीजखंडीत पुर्व सुचना दिल्याचे आठवत नाही वीज सतत खंडीत होत असल्याने भाविक नागरीक त्रस्त झाले आहेत. वीज बिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा तोडण्याचा इशारा देणाऱ्या महावितरण मंडळाची सुरळीतपणे वीजपुरवठा करण्याची जबाबदारी नाही का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. मागील ऐक वर्षापासून तिर्थक्षेञ तुळजापूर येथे ठराविक भागात विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. कधी तांत्रिक बिघाड तर कधी देखभालीच्या नावाखाली दिवसभरात अनेक तास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळेतही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहर अंधारात बुडून जात आहेत. या प्रकारामुळे भागातील लगुउद्योजकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित आस्थापनेस संपर्क साधला असता महावितरणाचे प्रशासन त्यास प्रतिसाद देत नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे, पूर्ववत होण्याचा कालावधी आदी माहिती वीजग्राहकांना मिळत नाही. वीजदेयक वेळेत न भरल्यास उपस्थित होणारे महावितरणाचे प्रशासन वा त्यांचे अधिकारी, प्राधिकारी ग्राहकांच्या संपर्काला प्रतिसाद का देत नाहीत? त्यांना ते कमीपणाचे वाटते का? असा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत.