भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील रामकुंडमध्ये बिबट्याचा गायीवर हल्ला करून गायला बिबट्याने ठार केले.
अधिक माहिती अशी की, वन विभागाने रामकुंड येथे दि. 27 डिसेंबर रोजी रात्री 8: 40 वाजता तेथील ट्रॅप कॅमेरा लावला. तेथील शेतकरी सुदाम हाके यांच्या गावठाण तलावाच्या परिसरात असलेल्या शेतामध्ये गायी वर हल्ला केल्यानंतर तिथे ट्रॅप कॅमेरा लावला असतात तेथील कॅमेरामध्ये बिबट्या दिसून आला. वन विभागाला संपर्क केला असता लावलेल्या ट्रॅप कॅमेरा मध्ये दिनांक 27 डिसेंबर रोजी बिबट्या कॅमेरा मध्ये दिसून आला असल्याचे वनविभागाचे अधिकारी दीपक गांदले यांनी सांगितले. मागील एक ते दीड महिन्यापासून भूम तालुक्यात बिबट्या किंवा बिबट्या सदृश्य प्राणी असल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने बोलले जात होते. मात्र यावेळेस हा बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. तालुक्यात काही ठिकाणी मुक्या जनावर या बिबट्याने हल्ला केला. तर मात्रेवाडी येथे शेतकऱ्यावर हल्ला केला होता. मात्र अद्याप हा बिबट्या तालुक्यातील परिसरातच असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या वन विभाग या बिबट्याचा शोध घेत असून अद्यापही बिबट्याला शोधण्यास वन विभागांना यश आलेले नाही.