तुळजापूर( प्रतिनिधी) -, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिल्हा उपरुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,सदर कार्यक्रमाचे उद्घाटन रुग्णालय अधिक्षक डॉ दिपक चोरमारे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी उपस्थित स्वयंसेवकांना समुपदेशक श्रीमती रुपाली देशमुख यांनी मार्गदर्शन केले तर सदर प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ होणमाने, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीमती रुपाली चौधरी, तुळजाभवानी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा विवेकानंद चव्हाण यांच्या सह डॉ आनंद मुळे, डॉ मंत्री आर आडे यांचे उत्तम सहकार्य लाभले.सदर कार्यक्रम तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा विवेकानंद चव्हाण यांनी मानले.

 
Top