धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय मजदूर संघ प्रणित भारतीय डाक कर्मचारी संघ आगामी काळात पोस्टल कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार असून जास्तीत जास्त डाक कर्मचाऱ्यांनी या संघात सहभागी व्हावे. असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विजयकुमार वाघमारे यांनी केले ते धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय डाक कर्मचारी संघाच्या द्विवार्षिक अधिवेशनात बोलत होते. 

यावेळी भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष विकास गाडेकर माजी अध्यक्ष गोविंदराव आयचीत, रामेश्वर दाभाडे सहप्रदेश सचिव वर्ग 3 छत्रपती संभाजी नगर, सचिन आवटे सहप्रदेश सचिव वर्ग 4, श्रीमती.सी.ए. बारगजे पोस्टमास्तर धाराशिव, पत्रकार देवीदास पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. तर यावेळी पत्रकार देविदास पाठक यांनी भारतीय मजदूर संघाच्या कार्यपद्धतीनुसार डाक कर्मचाऱ्यांनी काम करून देशहिताला प्राधान्य देत आपल्या कामाला सर्वोच्च स्थानी न्यावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत करण्यासाठी ज्या प्रयत्नाला साथ द्यावी असे आवाहन केले. हे द्विवार्षिक अधिवेशन व्ही.व्ही. गोवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत तोडकर विभाग सचिव यांनी केले. तर सूत्रसंचालन अमोल जाधव व आभार प्रदर्शन संदीप कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व पोस्टल कर्मचारी, भारतीय मजदूर संघचे पदाधिकारी होते. यानंतर भारतीय मजदूर संघ धाराशिव विभाग त्रैवार्षिक अधिवेशन देखील पार पडले.

याचे प्रास्ताविक विकास गाडेकर  विभाग सचिव यांनी  केले. तर सूत्रसंचालन अमोल जाधव, आभार प्रदर्शन संदीप कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमासाठी  सर्व  भारतीय मजदूर संघचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारतीय मजदूर संघ धाराशिवची 2024 ते 2027 साठी कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष म्हणून व्ही. व्ही. गोवर्धन तर सरचिटणीस  म्हणून विकास गाडेकर, कोषाध्यक्ष विकास भातम्बरेकर, सह सचिव अमोल जाधव यांची निवड करण्यात आली.

 
Top