तुळजापूर (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंञीमंडळात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या रुपाने स्थान मिळेल असे वाटत असताना स्थान न मिळाल्याने भाजप गोटात कार्यकर्त्यांमध्ये निराशाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार तानाजी सावंत परिवाराने पहाटे येवुन श्रीतुळजाभवानी मातेचा कुलधर्म कुलाचार केला. पण त्यांना ही मंत्रीपद मिळाले नाही. त्यांचा पदरी ही निराशा आली. आता जिल्हयाला मंत्रीमंडळात स्थान मिळणार नसल्याने महायुतीत निराशाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर महाविकास आघाडीमध्ये खुशीचे वातावरण पसरले आहे.
श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तुळजापूर विधानसभा मतदार संघ आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दोनदा कमल फुलवले. पण दोन्ही वेळी त्यांना विविध राजकिय समीकरणे निर्माण होवुन मंञीपदापासुन दूर राहावे लागले. तुळजापूर विधानसभा मतदार संघात आजपर्यत फक्त माजी आमदार मधुकर चव्हाण यांना एक वेळी मंञीपद व एक वेळा विधानसभा उपाध्यक्ष व मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळ अध्यक्ष रुपाने लाल दिवा मिळाला. आता भाजप निवडुन आल्याने यंदा निश्चितपणे तुळजापूरला लाल दिवा मिळेल असे वाटत असताना तो मिळाला नसल्याने भाजपमध्ये निराशाचे वातावरण निर्माण झाले आहे. आ राणाजगजितसिंह पाटील यांचे मागील वेळी शिवसेना व राकाँ पक्षफुटीमुळे तर आता महायुतीस प्रचंड जागा मिळाल्याने मंत्रीपदापासुन वंचित राहावे लागले.
आता जिल्हयाच्या पालकमंत्रीपदी पंकजा मुंढे यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा निष्ठावंतांना मंत्रीपद दिल्याचे भाजप कार्यर्त्यांमधुन चर्चा आहे. जिल्ह्याला मंञीपद न मिळाल्याने याचे आगामी नगरपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर काय परिणाम होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.