तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यात मागील दहा दिवसापासुन आठ ते दहा गावांमध्ये बिबट्या फिरत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गेली दहा दिवसापासुन वन विभागाचे चार पथके बिबट्या शोधात फिरत आहेत. माञ त्यांना बिबट्या वावरात असल्याचे चिन्हे दिसले ना खुना दिसल्याने हा फीरणारा बिबट्या गेला कुठे असा प्रश्न सर्वाना पडला आहे.
तुळजापूर तालुक्यात मागील महिन्यात मगर फिरत असल्याची चर्चा होती. अखेर ती वडगाव लाख येथे पकडली. त्यानंतर लगेचच आता बिबट्या फीरत असल्याची चर्चा गावोगाव होत आहे. रविवारी चव्हाणवाडी येथे ऊसाचा शेतात बिबट्या आल्याची चर्चा होती. अखेर याची माहीती वनविभागाला मिळताच तिथे पथक गेले पण हाती काहीही लागले नाही. शेवटी वनपथक रिकाम्या हाताने परत फिरले. वन विभागाने बिबट्या शोधासाठी अठरा जणांचे चार पथके कार्यान्वित केली आहे. ते पोलिस पाटील, गावपुढारी यांनी सांगताच वनविभाग पथक तिथे जावुन उसात फिरुन पाहणी करीत आहात. आज पर्यत वाडीबामणी, कामठा काञी, आपसिंगा, सरडेवाडी, चव्हाणवाडी, मेसाई जवळगा, कसई, वडगाव लाख यासह अनेक भागात दिसल्याची माहीती होताच वनविभाग पथक तिथे जावुन पाहणी करुन येत आहे. माञ बिबट्या अजुन ही नजरेस पडला नाही. सोशल मिडीयावर माञ सर्वत्र जुने बिबट्याचे व्हीडीओ मोठ्या संखेने व्हायरल होत आहेत.
बिबट्याचा ठसे फोटो वरुन शोध सुरु
वन विभागाने ग्रामस्थानी बिबट्याचा पायाचे चिखलातील ठशांचे फोटो काढुन ते खरे बिबट्याचेच आहेत का याची खाञी करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवत आहेत. पण ते बिबट्याचेच आहेत याचे तथ्थ दिसत नसल्याचे समजते. तरीही कुणाला बिबट्या दिसल्यास वनविभागाला संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.