तुळजापूर (प्रतिनिधी)-जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने 4 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. सदर महोत्सवात विज्ञान व तंत्रज्ञान मधील नवसंकल्पना (Innovation on Science & Technology) या विषयात श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य विभागातील विद्यार्थी अर्जुन भीमू देवकर, काजेम सिद्दीकी, झिरमिरे अर्पिता, प्रल्हाद पीरगट, मोहिनी यादव, सुलगंडले संजना सोमेश्वर यांनी स्थापत्य विभाग प्रमुख प्रा दीपक पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या 'कंपोस्ट खत मशिन' या प्रकल्पाला प्रथम पारितोषिक मिळाले. पुढील विभागीय स्पर्धा लातूर येथे होणार असून त्यांची निवड झाली आहे. 

या यशाचे सर्व विश्वस्थांनी कौतुक केले तसेच मंदिर संस्थान तहसिलदार तथा व्यवस्थापक श्रीमती माया माने यांनी विजेत्या विध्यार्थ्यांचे कौतुक व सत्कार तसेच बहुमूल्य मार्गदर्शन केले. या प्रकल्पासाठीसाठी मा. जिल्हाधिकारी व सर्व विश्वस्त यांचे सहकार्य तसेच प्राचार्य प्रा रवि अडेकर, उपप्राचार्य प्रा. रवि मुदकमा,  स्थापत्य विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा. विवेक गंगणे यांनी

केले.         


कंपोस्ट खत मशीन प्रकल्प

या मशीन द्वारे शेतातील, घरगुती, हॉटेल, भाजीमंडई तसेच नगरपालिकेचा सुका व ओला धनकचरा कंपोस्ट खतामध्ये कमीत कमी कालावधी मधे रुपांतरीत करता येईल. यामुळे रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी होण्यास मदत होईल तसेच मातीचा कस वाढेल व रासायनिक खतांचा जनसामान्याच्या आरोग्यावर होणारे दुष्परीणाम टाळता येतील. अशी माहिती श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी दिली.

 
Top