तुळजापूर (प्रतिनिधी)-नांदेड येथे पार पडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या कबड्डी या क्रीडा प्रकारामध्ये श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. मुलाच्या संघानेही उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. या त्यांच्या यशाबद्दल तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा  व्यवस्थापक श्रीमती माया माने यांनी विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा सत्कार केला आणि त्यांचे कौतुक केले. अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात ही नावलौकिक गाजवावा  जेणेकरून महाविद्यालयाचे आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानचे नाव सर्वदूर पोहोचेल अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुलींमधून अर्चना कांबळे, ऋतुजा कदम, तेजस्विनी कांबळे, रुद्राक्ष यादव  या चार विद्यार्थिनींची विभागीय पातळीवर निवड झाली असून तेथे मुलींचा संघ विजेता ठरलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांमधून  प्रसाद गुरव  याची विभागीय पातळीवर निवड झाली आहे. या यशाचे  सर्व विश्वस्त यांनी कौतुक केले आहे. मुलींच्या संघामध्ये अर्चना कांबळे, ऋतुजा कदम, तेजस्विनी कांबळे, वैष्णवी स्वामी, नीता चाम वाढ, रुद्राक्ष यादव,अश्विनी केकन,तनवी कराळे, नम्रता फराटे या विद्यार्थिनींचा समावेश होता. तसेच मुलांच्या संघात ऋषिकेश कणसे, दिनेश वराळे, अभिषेक बिराजदार, राजकुमार डोंगरे, प्रसाद गुरव, वैभव कदम,सुभाष नरडीले, तेजस नागे, ज्ञानेश्वर ताटे, अनिकेत कवडे, स्वप्निल जाधव, बालाजी स्वामी  यांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये त्यांना सर्व बाबतीत मार्गदर्शन करणारे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शाम डोईजोडे तसेच प्रभारी प्राचार्य श्री रवींद्र आडेकर, उपप्राचार्य  रवी मुदकन्ना  सर आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विवेक गंगणे  यांनी केले.

 
Top