नळदुर्ग - येथील श्री खंडोबा यात्रा दिड महीन्यावर येवून ठेपली आहे, मात्र राष्ट्रीय महामार्ग ते श्री खंडोबा मंदीरा पर्यंतच्या रस्त्याचे काम दिड महीन्यात होणार की नाही यात शंका आहे, कारण होणाऱ्या कामाचा वेग पाहता यात्रे पूर्वी हे काम होणे आवघड आहे, त्यामुळे येणाऱ्या दिड महीन्या भाविकांना येण्या जाण्यासाठी रस्त्याची रुंदीकरण तरी लवकरात लवकर करावे अशी मागणी आता भाविकांतून होत आहे.
३ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील लाखो घराण्याचे कुलदैवत असणारे नळदुर्गच्या श्री खंडोबाचे आगमन आणदुर येथून नळदुर्ग ( मैलारपूर ) येथे होणार आहे. दरम्यान या ठिकाणी सुमारे पावणे दोन महीने श्री खंडोबाचे वास्तव्य आसणार आहे. या कालावधी मध्ये दररोज हजारो भक्त श्री खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येतात. तर दर रविवारी सुमारे लाखावर भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करीत आसतात. तीर्थक्षेत्राला जाण्यायेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ते श्री खंडोबा मंदीर पर्यंत आमदार राणा जागजितसिंह पाटील यांनी आठ कोटी रुपयेचा रस्ता मंजूर केला आहे, या रस्त्याचे काम सध्या चालू आहे, या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागा कडून होत आहे, तर हे काम कृष्णाई कंट्रक्शन कंपनी करीत आहे. सध्या हे काम चालू असून रस्त्याची रुंदी वाढविण्याचे काम सुरु आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाली बांधकाम होत आहे. मात्र सध्या गेल्या दिड महीन्यापासून या रस्त्याच्या एका बाजूच्या नालीचे काम सुरु आहे, परंतु होत असलेले काम एकदम संथ गतीने होत आहे. आणखीन एका बाजूची नाली बांधकाम होणे बाकी आहे, सध्या होत असलेल्या नाली बांधकाम आणखीन पंधरा दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करुन हा रस्ता संपूर्ण कांक्रीटीकरण करणे यासाठी बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. शहरातील सुमारे ७८ कोटी रुपयेचे काम संबधीत कंपनीकडून होत आहेत, आणि या कामासाठी त्यांना सुमारे दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम ही येणाऱ्या दीड महीन्यात या रस्त्याचे काम पूर्ण होणार की नाही यात शंका आहे.
येणाऱ्या दीड महीन्यात म्हणजे दि. १२, १३ व १४ जानेवारी २०२५ या कालावधी पौष पौर्णिेमेच्या दिवशी या ठिकाणी श्री खंडोबाची यात्रा भरणार आहे. या यात्रेला सुमारे सहा ते सात लाख भाविक येत आसतात. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून या यात्रेसाठी भाविक येतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सीमा वर्ती भागातील चलमुर्ती म्हणून समजली जाणारी ही यात्रा आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याचा विचार करुन येणाऱ्या दीड महीन्यात राष्ट्रीय महामार्ग ते श्री खंडोबा मंदीरा पर्यंतच्या रस्तयाचे रुंदीकरणाचे व रस्ता बांधकामाचे काम तात्काळ करुन घ्यावे अशी मागणी भाविकांतून होत आहे.