तुळजापूर - येथील मुख्य मार्गावर धोकादायक लोखंडी कमान कोणत्याही क्षणी कोसळुन अपघाताचा धोका या सदराखाली प्रसिध्द होताच अखेर ही धोकादायक कमान रविवारी काढण्यात आल्याने संभाव्य धोका टळला आहे.
धाराशिव - तुळजापूर रस्त्यावरील तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील आठवडी बाजार मार्गावरील लोखंडी कमानगंजून कलल्याने ती धोकादायक अवस्थेत उभी आहे. त्यामुळे अपघात होवून जिवीतहानी होण्याचा धोका असल्याने ही कमान काढून टाकावी असे वृत्त प्रसिध्द करण्यात .आले होते सदरील तीर्थक्षेत्र
तुळजापुरात प्रवेश करताच हॉटेल राजपॅलेस समोरील रस्त्यावर गाव, अंतर, मंदिराकडे जाणारा मार्ग अशी लिहलेली ५० फूट लांब, ३० फूट उंच लोखंडी कमान गजल्याने ती कलली आहे. तसेच मध्यभागी दाब आल्याने ती खचली आहे अखेर रविवारी दोन मोठे जेसीबी लावुन काढुन घेण्यात आल्याने या रस्त्यावरून दररोज येजा करणाऱ्या वाहनचालकांनी सुटकेचे श्वास सोडला.