नळदुर्ग : पौष पौर्णिमे निमीत्त दि. १२,१३ व १४ जानेवारी २०२५ रोजी भरणाऱ्या श्री खंडोबा यात्रेत आयोजित केल्या जाणाऱ्या जंगी कुस्त्यांच्या पार्श्वभूमीवर श्री खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समीतीच्या वतीने कुस्तीच्या आखाडयाची पहाणी करुन उपाय योजना आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे, येणाऱ्या मंगळवारी दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी श्री खंडोबा देवाचे येथील मैलारपूर मंदीरात आगमन होणार आहे. यात्रेत जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.


नळदुर्ग मैलारपूर येथे श्री खंडोबा देवाची जानेवारी मध्ये यात्रा भरणार आहे, माता बाणाई आणि श्री खंडोबा यांचा विवाह नळदुर्ग मध्ये झाल्याचा इतिहास आहे, आणि या विवाह प्रसंगी भरणारी यात्रा म्हणून या यात्रेकडे पाहीले जाते. येत्या दीड महीन्यात ही यात्रा भरणार आहे, त्यामुळे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मैलारपूर नळदुर्ग येथे मोठया प्रमाणात जंगी कुस्त्यांचे आयोजन केले जाते, दरम्यान यात्रेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यासाठी श्री खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समीतीच्या वतीने बांधण्यात आलेल्या आखाडयाची पहाणी करण्यात आली आणि या ठिकाणी पूढे या आखाडयासाठी व आखाडयातील माती भुसभुशीत कशी करता येईल यासाठी उपाय योजना आखण्यात आल्या आहेत.या वेळी कुस्ती आखाडा समीतीचे अध्यक्ष रणजितसिंग ठाकूर, समीतीचे पदाधिकारी विनायक पूदाले, संजय मोरे पाटील, सुधाकर चव्हाण, दत्तात्रेय कोरे, अनिल पूदाले, रमेश जाधव, संतोष पूदाले, सुहास येडगे, विलास येडगे, उत्तम बनजगोळे, अमर भाळे आदींनी या आखाडयाची पहाणी केली. दरम्यान पहाणी करुन आखाडयामध्ये जी माती आहे ती भुसभुशीत करण्यासाठी त्यामध्ये उपाय योजना करण्यात येत आहेत. सध्या आखाडया मध्ये पावसामुळे काटेरी झुडपे आणि गवत वाढले आसल्याने ते काढून टाकण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

यावर्षी मोठया प्रमाणात राज्यातून कुस्तीसाठी पैलवान कसे येतील यासाठी समीतीचा प्रयत्न आसणार आहे, त्यासाठी प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे, या कुस्ती स्पर्धेत मोठया प्रमाणात बक्षींसाची खैरात होणार आहे, त्यामुळे परिसरातील आणि राज्यातील जास्तीत जास्त पैलवानांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन ही समीतीच्या वतीने करण्यात आले आहे. याठिकाणी महाराष्ट्र केसरी, उप विजेता असे अनेक कुस्तीगीर यांनी आपला कुस्तीचा खेळ दाखवून उपस्थीतांची मने जिंकली होती. यावर्षी ही मोठया प्रमाणात कुस्ती स्पर्धेसाठी बक्षीस ठेवण्यात येणार आहेत.

 
Top