तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक मंगळवार दिनांक 10 रोजी धाराशिव येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी मावळते अध्यक्ष सुरज बागल यांनी जुनी कार्यकारणी बरखास्त करत नवीन कार्यकारणी निवड करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून उमरगा येथील प्रदीप नागदे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष पदी रोहित थोरवे कळंब सचिव गणेश भातुसे तुळजापूर तर कोषाध्यक्षपदी जावेद शेख धाराशिव यांची निवड करण्यात आली . यावेळी राज्य संघटनेतील कल्याणकारी मंडळ योजना सदस्य म्हणून सुरज बागल यांची तर राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून देविसिंग राजपूत येणेगुर व शोऐब मोमीन धाराशिव यांची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेत आगामी काळात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून संघटना मजबूत करण्याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित गणेश गायकवाड, प्रकाश जोजन, देवसिंग राजपूत,शाहरुख मकानदार,लहू पडवळ, अकबर शेख, प्रमोद वाघमारे, मोहन वाघमोडे, संतोष गायकवाड, रमेश बस, कुंडे सुरेंद्र सत्कर्गी ,अरविंद शिंदे, शोएब मोमीन, सुरज बागल, हसन नुरसे ,जावेद शेख, किशोर गायकवाड, विकास मदने, दिलीप जळके, तानाजी घोडकेमी, प्रदीप नागदे, गणेश भातुसे, दादा ननवरे, रामलिंग गाढवे, रोहित थोरवे, हनुमंत कमळे, बाळाराम राजपूत यांच्यासह जिल्हा भरातुन मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेते हजर होते.