नळदुर्ग (प्रतिनिधी)- बांग्लादेशातील हिंदूवर होणाऱ्या आत्याचाराच्या निषेधार्थ व बांग्लादेश सरकारचे निषेध व्यक्त करण्यासाठी आणि बांग्लादेशी हिंदुना न्याय मिळावा. या मागणीसाठी येथिल सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सरोदे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

मंगळवार दि. 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी साडे दहा वाजता येथील आंबाबाई मंदीरातून हा निषेध मोर्चा सुरु करण्यात आला. हा मोर्चा आंबाबाई मंदीर ते राष्ट्रीय महामार्गाने बसस्थानका समोरुन शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्याने राजामाता अहिल्यादेवी होळकर चौकातून भवानी चौक मार्गे, चावडी चौकातून पोलिस ठाण्यापर्यंत गेला. या निषेध मोर्चामध्ये शेकडो हिंदु बांधव सहभागी झाले होते. गर्व से कहो हम हिंदु है, जय भवानी जय शिवाजी, जय श्री राम, बांग्लादेशातील हिंदुना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोर्चा पोलिस ठाण्यात आल्या नंतर पोलिस निरीक्षक सरोदे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी या निवेदनाचे वाचन पंचायत समीतीचे माजी सदस्य साहेबराव घुगे यांनी केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत आमच्या मागण्या पोहंचविण्याचे मागणी करुन बांग्लादेशातील हिंदुना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी मानव अधिकार यांच्याकडे अंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून मांडण्यात येणाऱ्या भुमीकेला हिंदुचा पाठींबा असेल. त्याच बरोबर बांग्लादेशातील हिंदुवर होणाऱ्या कंटटर मुस्लीम पंथीयाकडून होणारा अत्याचार तात्काळ थांबविण्यात यावा, महीलावरील होणारा अत्याचार हा मावन जातीला काळीमा फासणारा आहे, तो अत्याचार थांबला पाहीजे या मागणीचे निवेदन यावेळी पोलिस ठाण्यात देण्यात आले. 

या मोर्चात बलभीमराव मुळे गुरुजी, माजी नगरसेवक दत्तात्रेय कोरे, साहेबराव घुगे, माजी नगरसेवे संजय बताले, विजयसिंह ठाकूर, माजी नगसेवक बसवराज धरणे, सुधीर हजारे, पत्रकार विलास येडगे, भगवंत सुरवसे, युवक गणेश मोरडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव श्रमीक पोतदार, भाजपा शहराध्यक्ष धिमाजी घुगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पूदाले, अक्षय भोई, सुभाषराव कोरे, अक्षय दासकर, मल्लीकार्जून गायकवाड, गणेश किल्लेदार, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे आदीसह बहूसंख्य हिंदु बांधव सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

 
Top