धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात जिल्हा शासकीय रुग्णालय, धाराशिव आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने  घेण्यात आले. या शिबिराचा उद्देश सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट (आभा) काढण्यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात  आले.

सदर कार्यक्रमासाठी डॉ.विक्रांत राठोर, श्री प्रदीप तटाळे, श्री श्रीनिवास निर्मळ, विश्वजीत जगदाळे, अमृत कुंभार सुजित पडवळ इत्यादी जिल्हा रुग्णालयातील पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सावता फुलसागर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सहसमन्वयक डॉ. संदीप देशमुख आदींसह सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

 
Top