तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यात मागील सहा ते सात वर्षापासुन पवनचक्की कामे मोठ्या संखेने सुरु असुन ज्या शिवारात पवनचक्की येत आहेत तिथे वादविवाद, हाणामारी घटना वाढुन गुन्हेगार प्रमाण वाढत चालले आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास यावर वेळी प्रतिबंध न घातल्यास केज तालुक्यातील मस्साजोग सारखी घटना तालुक्यात घडण्याची मोठी शक्यता आहे.
पवनचक्की बरोबरच ग्रामीण भागात गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच पती संतोष पंडितराव देशमुख यांची पवनचक्की प्रकरणावरुन झालेल्या हत्यामुळे तुळजापूर तालुक्यातील पवनचक्यांमुळे ग्रामीण भागात अशांततेचे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पवनचक्की माध्यमातून शहरी भागातील गुन्हेगार ग्रामीण भागात पोहचल्याची चर्चा आहे. याचा फटका शेतमालक, ग्रामपंचायत सरपंचाना बसत आहे. माञ पवनचक्की प्रकरणातील नव्वद टक्के घटना पोलिस दप्तरी पोहचत नसल्याने पवनचक्की गुन्हेगारांचे फावत आहे. अशा मंडळी विरोधात एकटा शेतकरी असमर्थ ठरत असल्याने शेतकरी अन्याय सहन करीत आहे.
पवनचक्की बनवणा-या विविध कंपन्या ग्रामीण भागातील शेतजमीनी विकत, भाड्याने घेण्याचे प्रमाण वाढले आहे. जिथे पवनचक्की उभारायाची प्रथम तिथे शेतखरेदी नंतर त्या भागासाठी रस्ता तयार करताना दलाल माध्यमातून ही यंञणा राबवली जाते. हे दलाल गोरगरीब शेतकऱ्यांना कमी किमतीत विविध प्रलोभने दाखवुन जमिनी खरेदी करीत आहेत. वेळेप्रसंगी दडपशाही, मारहाण सारखे प्रकार करुन जमिनी घेत आहेत. चालु झाल्यानंतर कुणाचा आपल्याला ञास होवू नये म्हणून गुंड प्रवतीचे लोक ठेवुन आपला व्यवासाय करीत आहेत. पवनचक्की कंपनीमुळे गुंड व दलाल मालामाल झाला आहे. तर शेतकरी माञ अक्षरशा कंगाल होत आहे. चिवरी, नळदुर्ग, गंधोरा, मोर्डा, धारुर, मानेवाडी या भागात होत असलेल्या पवनचक्की शेकडो भरडत असल्याचे बोलले जाते. यात शेतरस्ता करताना गौण खनिज मोठ्या प्रमाणात होत. यात प्रशासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडत आहे. याकडे संबधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी का दुर्लक्ष करतात हे ग्रामस्थांनाक ळेनासे झाले आहे. पवनचक्कीतील या भीषण सत्या बाबतीत लोकप्रतिनिधी सह कुणीही आवाज उठवत नसल्याने गोरगरीब शेतकरी देशोधडीला लागत आहे.