तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मंदीर महाद्वारते शुक्रवार पेठ पाणी टाकी या मार्गावर रस्ता मधोमध शेकडो विविध वाहने उभे केल्याने याचा ञास या भागात वास्तव्य करणारे भाविक व रहिवाशांना होत असल्याने हा रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी होत आहे.
विधानसभा निवडणुकपुर्वी या भागातील दगडी पायऱ्या रस्त्यावर असणाऱ्या लोखंडी गेटमुळे भाविक, रहिवाशांना त्रास होत असल्याने ते काढले. आता मार्गक्रमण करणे सुरु होईल असे वाटत असतानाच राजमाता जिजाऊ महाद्वार ते दशावतार मठ पर्यत रस्ता मधोमध दुचाकी वाहने उभे केले जात असल्याने हा रस्ता अतिक्रमणमुळे अधिकच अरुंद झाला. याचा फटका मार्गक्रमण करणाऱ्यांना बसत आहे. ज्या उद्देशान लोखंडी गेट काढले होते तो उद्देश तर सफल झालाच नाही मात्र अरुंद रस्ता अतिक्रमणमुळे आणखी छोटा झाल्याने भिक नको पण कुञ आवार अशी परिस्थिती येथील रहिवाशांवर आली आहे. येथे कुणीही येवुन दुचाकी उभ्या करीत असल्याने देशद्रोही प्रवृत्ती याचा फायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंदीर समोरील परिसर सुरक्षायंत्रणे बाबतीत येथे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मंदिर लगत जवळ असलेले खडकाळ गल्ली पासून शुक्रवार पेठ कडे जाणाऱ्या रस्त्यावर टु व्हीलर व 4 व्हिलर वाहनांची गर्दीच गर्दी असते. पायऱ्या काढून भक्तांसाठी खुला केलेला रस्ता वाहनांनी काबीज केला. त्यामुळे भक्तांना कसरत करून चालावे लागत आहे.
वाहनावर दंडात्मक कारवाई करा -अमृतराव
येथील रस्त्यावरी अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपरिषद, पोलिस, मंदीर प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन येथे वाहने उभे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. वाहने जप्त करुन चारपट दंड वसुल करण्याची मागणी शेकापचे नेते उत्तम अमृतराव यांनी केली आहे.