तुळजापूर - मराठायोध्दा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तीर्थक्षेत्र तुळजापूरात श्रीतुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेवुन मराठा आरक्षण लढ्याचे नव्याने रणशिंग फुकले. मराठा आरक्षण आंदोलानाची पुढची दिशा लाखो मराठ्यांचे सामुहीक आंदोलन राहील. मुंडक्यावर बसुन मराठा आरक्षण घेणार अशी घोषणा जरांगे यांनी  केली. 

 

मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांचे तुळजापूरात भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर भवानी रोडमार्गे श्रीतुळजाभवानी मंदिर महाद्वार जवळ त्यांचे फटाक्याच्या प्रचंड अतिषबाजीने स्वागत केले. नंतर राजेशहाजी महाद्वार मार्गे मंदिरात जाऊन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. नंतर सामुहीक महाआरती केली. 


तुळजाभवानी मंदिरात प्रसार  माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले कि  यानंतर मराठा आरक्षण  बाबतीत  आंतरवली किंवा  मुंबई येथे सामुहीक उपोषण होईल पण ते समाजाला विचारुन  केले जाईल  मराठ्यांमुळे सत्ता आली आहे. ओबीसी आमदार मराठ्यांमुळे निवडुन आले हे लक्षात घ्यावे. विधानसभा निवाडणुकीत मराठा फॅक्टरबाबत बोलताना ते म्हणाले, आम्ही मैदानात नव्हतो हे लक्षात घ्या. निवडून आलेल्या २०६ मराठा आमदारांनी मराठा  आरक्षण साठी तुटुन पटावे असे आवाहन यावेळी केले. 

 
Top