नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहर व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी सतीश पूदाले यांची तर सचिव पदी संतोष मुळे यांची एक मताने निवड करण्यात आली आहे, या निवडीचे शहरातून त्यांचे स्वागत होत आहे.
धाराशिव जिल्हायातील व्यापाऱ्यांची धाराशिव येथे दि. 8 डिसेंबर रोजी बैठक पार पडली, या बैठकीत नळदुर्ग शहरातील व्यापारी महासंघाची ही कार्यकारीणी निवडण्यात आली आहे.ही निवड मराठवाडा विभागाचे अध्यक्ष श्री बंब, मराठवाडा महीला व्यापारी महासंघाच्या अध्यक्षा सौ सीता मोहीते पाटील, गोविंद साकाल आदींनी ही निवड केली आहे. यावेळी नळदुर्ग शहराच्या व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी सतीश पूदाले तर सचिव पदी संतोष मुळे यांची निवड करण्यात आली. यावेळी नुतन अध्यक्ष सतीश पूदाले बोलाताना म्हटले की, यापूढे नळदुर्ग शहरातील व्यापाऱ्यांच्या आडचणी समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून हा व्यापारी संघ बळकट आणि मजबुत कसा होईल यासाठी ही माझा प्रयत्न असणार आहे, यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव, सचिव महेश वडगावकर, मराठवाडा उपाध्यक्ष संजय मोदाणी, नळदुर्ग शहरातील व्यापारी मुंकूद नाईक, सुभाष कोरे, विशाल डुकरे आदी उपस्थीत होते.