धाराशिव (प्रतिनिधी)- बांगलादेशमध्ये मागील काही दिवसांपासून हिंदू समाजातील महिला पुरुषांवर अनन्वित अत्याचार होत आहेत, या अत्याचाराला पायबंद घालावा. हिंदू समाजाचे मानवाधिकार या अत्याचारामुळे उल्लंघन होत आहे. हिंदू बांधवांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

या निदर्शनासाठी धाराशिव शहरातील विविध सामाजिक संघटना सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.यात विश्व हिंदू परिषद ,अधिवक्ता परिषद , अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सामाजिक समरसता मंच, हिंदू एकजूट ,भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे, गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवप्रतिष्ठान, इस्कॉन, धारासुर मर्दिनी महिला फेडरेशन, राष्ट्रसेविका समिती, यांच्यासह अनेक सामाजिक संघटना या धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

समाजावर अनन्वित अत्याचार अन्याय होत असून दिवसाढवळ्या हिंदूंची कत्तल तसेच महिलांची इज्जत लुटण्याचे काम सुरू आहे.  तसेच हिंदूंची धार्मिक स्थळे नष्ट करणे गोमतीची हत्या आणि गोमाता वर हल्ला करणे तसेच हिंदू धर्माची श्रद्धास्थाने यांना इजा पोहोचवणे नष्ट करणे यासारख्या क्रूर घटना घडत आहेत. ह्या घटना थेट मानवाधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या असून यामुळे आज मानवाधिकार दिनी मानवाधिकार आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन या जिहादी मानसिकतेला त्वरित आवर घालावा. या धरणे आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन ही सादर केले. धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुका स्थानीही सकल हिंदू समाजाच्या वतीने निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

 
Top