तुळजापूर-
भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये देशाचा गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी सर्व पक्ष संघटनांनी निषेध व्यक्त केला. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा समन्वयक तानाजी कदम, विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, शहराध्यक्ष अरुण कदम, युवक शहराध्यक्ष अमोल कदम, युवक सरचिटणीस आतिश कदम, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष आप्पा कदम, कामगार आघाडी शहराध्यक्ष रवि वाघमारे, शहर उपाध्यक्ष वैजनाथ पांडागळे, प्रा. अशोक कांबळे, तालुका उपाध्यक्ष किसन पांडागळे, बसवंत जाधव, दाजी माने, वडार समाजाचे बाळू शिंदे, महादेव सोनवणे, तानाजी डावरे, विजय गायकवाड, सुरेश चौधरी, ज्ञानदेव शिंदे, मुकेश चौधरी, बाळासाहेब कदम, विकास चौधरी, विनोद भालेकर, रामचंद्र गवळी, आतिश जवळगेकर, दिलीप हावळे, धनंजय कदम, रवींद्र कदम, लिंबाजी कदम, भागवत कदम, संजय गायकवाड, रमेश गायकवाड, बाबा मस्के, विलास सरवदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.