धाराशिव - 

नागपूर-लातूर-बार्शी-टेंभूर्णी या महामार्गाचे चौपदरीकरण कामातील येडशी बायपास व पुढे टेंभूर्णीपर्यंतच्या कामालासूध्दा मंजूरी दिली जाईल, अशी ग्वाही आज केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री मा.ना.नितिन गडकरी यांनी नागपूर येथे आ.विक्रम काळे यांनी भेट घेतली असता दिली. 

लातूर-बार्शी-टेंभूर्णी या महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे या साठी अनेक वर्षांपासून जनआंदोलन होत आहे. लातूर, धाराशिव व सोलापूर या जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग लातूर व परिसरातील जनतेसाठी अतिशय महत्वाचा आहे. असे असतांना, मागणी नसतांना लातूर-उजनी-तुळजापूर हा महामार्ग चौपदरीकरण झाला. आ. विक्रम काळे यांनी गेल्या वर्षीच्या छ.संभाजीनगर येथील मंत्रीमंडळ बैठकीत लातूर-टेंभूर्णी या महामार्गाची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेबांच्या मार्फत करुन घेतलेली होती. त्यानंतर मंत्रालयात त्यांच्या दालनात संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय बैठकही दादांनी घेतली होती व तेथूनच मा.ना.नितिन गडकरी यांना फोनवरती बोलून या रस्त्यास मंजूरी देण्याची विनंती केली होती. त्यानूसार सदरील रस्त्याचा सविस्तर डिपीआर तयार करण्यात आला व तो केंद्रिय मंत्रालयाकडे सादर करण्यात आला. तद्नंतर बोरगांव (काळे) येथे श्री. प्रशांत साखरे, श्री. उमेश देशमूख, श्री. उध्दव जाधव यांनी आमरण उपोषणही केले होते. त्यात कृती समितीचे डॉ. हनुमंत चांडक, प्रा. अंकुश नाडे यांचाही सक्रिय सहभाग होता. आ.विक्रम काळेंनी सदरील आंदोलनास भेट देऊन शासकिय तंत्रनिकेतन ते 12 नं. पाटी पर्यंत रस्त्याचे मजबूतीकरण,नुतनीकरण करावे व मुरुड अकोला ते बोरगांव (काळे), करकटापर्यंतच्या मंजूर 7 मीटर रुंदीच्या रस्त्याचे रुपांतर 9 मीटरमध्ये करुन चौपदरीच्या रस्त्याची 1 बाजूस काम सुरु करावे, तरच आंदोलन मागे घेतले जाईल, नसता हे काम अडवले जाईल, अशी ताठर भुमिका घेतली. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतन ते 12 नं. पाटी पर्यंत नुतनीकरणाचे काम सुरु झाले. 12 नं. पाटी ते मुरुड अकोला मधील 4 मंजूर पूलाचे कामपण सुरु झाले व मुरुड अकोला ते बोरगांव (काळे) करकट्टा पर्यंत चौपदरीकरणातील एक डावी बाजू 9 मीटरच्या पूर्ण रुंदीने करण्याचे काम सुरु झाले.  काल नागपूर येथे आ. विक्रम काळे यांनी केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितिन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. काम मंजूर केल्याबद्दल पुष्पगुच्छ व पेढे देऊन लातूरकरांच्यावतीने आभार मानले व मुरुड अकोला ते बोरगांव (काळे), करकट्टापर्यंतच्या 11 कि.मी लांबीचा दुसऱ्या उजव्या बाजूचा रस्त्यास कसबे तडवळे हे गाव मोठे असल्यामुळे व तेथे राज्यमहामार्गालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्कामी राहीलेलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत आहे, त्यामुळे गावातून रुंदीकरण रस्ता करण्याऐवजी बाह्यवळण रस्त्याला, जवळा ते येडशी या 4 कि.मी बाह्यवळण रस्त्यास व येडशी-बार्शी ते टेंभूर्णीपर्यंतच्या पूढील टप्प्यास मंजूरी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली असता, "मी बोलतो ते करतो, आता मुरुड-अकोला ते बोरगांव (काळे) इथपर्यंतच्या एका बाजूस तसेच पुढे बोरगांव (काळे) ते जवळा पर्यंतच्या 37.5 कि.मी दोन्ही बाजुच्या चौपदरीकरण रस्त्यास मंजूरी देऊन साधारण रु.580 कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे उर्वरित प्रलंबित सर्व कामांस आम्ही मंजूरी देऊ आणि लातूर-टेंभूर्णी हा राज्य महामार्ग लवकरच पूर्ण करु" असे सांगीतले. यावेळी सोबत राष्ट्रवादीचे श्री. खेमराज कोंडे व श्री. खराबे पाटील उपस्थित होते.

 
Top