परंडा - तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्रम्हगांव या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे पूनर्गठन करण्यात आले.समितीच्या नूतन अध्यक्षपदी फुलचंद परमेश्वर ओव्हाळ यांची तर नूतन उपाध्यक्षपदी महादेव गोवर्धन हिंगणकर यांची एकमताने निवड करण्यात आली.


  शालेय समितीची मुदत संपल्यामुळे नवीन व्यवस्थापन समिती निवडण्यासाठी शाळेत पालक सभा घेण्यात आली.या सभेला केंद्रप्रमुख रविंद्र पाटील,निरीक्षक म्हणून उपस्थित होते.पालक सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक  लहु मासाळ यांनी केले.केंद्रप्रमुख रविंद्र पाटील सर यांनी उपस्थित पालकांना शाळा व्यवस्थापन समितीची रचना, कार्य, जबाबदारी व कर्तव्य याबद्दल मार्गदर्शन केले. नूतन शाळा व्यवस्थापन समिती पुढील प्रमाणे -  फुलचंद परमेश्वर ओव्हाळ - नुतन अध्यक्ष , महादेव गोवर्धन हिंगणकर  उपाध्यक्ष ,सौ.प्रियंका शाम लोंढे - सदस्या ,सौ.दिपाली मकरध्वज वाघमारे ,सौ.निकिता हनुमंत मोहिते ,रोहिणी तानाजी सांगडे ,सौ.रोहिणी सुधिर काळे , अमर पोपट ओव्हाळ,संतोष बाळासाहेब बागल ,अंगद सुब्राव लोंढे ,शिक्षणप्रेमी सदस्य भाऊसाहेब श्रीमंत ओव्हाळ, ग्रा.पं.सदस्य प्रतिनिधी श्रीम.सुषमा सुभाष चव्हाण , शिक्षक प्रतिनिधी  लहु नागनाथ मासाळ सचिव (मुख्याध्यापक) विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून श्लोक हनुमंत मोहिते व अवनी शाम लोंढे यांची एकमताने निवड करण्यात आली.


     यावेळी पालक सभेला मा.सरपंच भाऊसाहेब ओव्हाळ,पोपट ओव्हाळ, तानाजी सांगडे ,रावसाहेब वाघमारे,अंगद लोंढे, शाम लोंढे, जगन्नाथ ओव्हाळ, नागनाथ ओव्हाळ, सुधीर काळे, बाळू ढवळे, हनुमंत मोहिते, शिवाजी गवळी श्रीम. सुष्मा चव्हाण श्रीमती अपेक्षा ओवळ आदी उपस्थित होते. यावेळी सर्व नूतन समिती पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी कार्यक्रमाचे आभार श्रीम.सुषमा चव्हाण यांनी   मानले.

 
Top