परंडा -
परंडा तालुक्यात बिबट्याने गेल्या पंधरा ते वीस दिवसा पासून धुमाकुळ घालून दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने माजी आमदार राहुल मोटे यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना बिबट्या पासून संरक्षण मिळावे यासाठी निवेदन सादर केले. एक्सपर्ट टीम मागवून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
निवेदनात म्हटले की, परंडा तालुक्यात मागील पंधरा ते वीस दिवसापासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याने अनेक जनावरांचे लचके तोडून ठार केले असल्याने पशुधनाचे नुकसान झाले आहे. बिबट्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाली असून मनुष्यहानी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही . बिबट्याची संख्या जास्त प्रमाणात असल्याने वन विभागाच्या पथकाने बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी वन विभागाच्या बाहेरील एक्सपर्ट टीम मागवून बिबट्यांचा बंदोबस्त करावा व ज्या शेतकऱ्यांचे जनावरांची जीवित हानी झाली अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मोटे यांनी वन विभागाकडे केली आहे.