तुळजापूर - तालुक्यात पवनचक्की उभारणाऱ्या रिन्युव्ह कंपनीच्या वतीने अनेक गावात शेतकऱ्यांना दमदाटी करून मावेजा न देता चुकीच्या पद्धतीने जमीन बळकवत आहेत. शेतात बळजबरीने घुसून दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रिन्युव्ह कंपनीच्या लोकांविरुद्ध कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा विशाल रोचकरी यांनी पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.


निवेदनात म्हटले की, मेसाई जवळगा येथील शेतकऱ्यांच्या शेतात रिन्युव्ह कंपनी पवनचक्की कंपनीचे लोक घुसून जीवे मारण्याची धमकी देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण स्वतः जाऊन पाहणी केली असता तेथे पवनचक्की कंपनीचे पुणे येथील 40 ते 50 लोक हजर होते. तेथील शेतकऱ्यास त्रास देऊन दमदाटी करत होते. त्यांच्या शेतातील पिकाचे नुकसानही करत होते. त्यांना समजावून सांगितल्यानंतर एक दिवसासाठी काम बंद केले. परंतु पुन्हा हे लोक शेतकऱ्यांना त्रास देत असून पिकाची नासधूस करत आहेत.  याची योग्य ती चौकशी करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 


 
Top