खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पाठपुराव्यास यश


धाराशिव- 

धाराशिव, लातूर, उदगीर परीसरातील नागरीकांची मागील अनेक वर्षापासूनची प्रलंबीत मागणी  अखेर रेल्वे मंत्रालयाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पाठपुराव्यास यश आले असून प्रवाशांची गैरसोयही दूर झाली आहे. 

 

धाराशिव येथील रेल्वे प्रवाश्यांना तिकीट काढून देखील साधारणत: 10 ते 15 दिवस प्रतीक्षा यादीमध्ये थांबावे लागत होते. यामुळे प्रवाश्यांची गैरसोय दुर होणार असून यापुढे नागरीकांना प्रतीक्षा यादीमध्ये थांबावे लागणार नाही. लातूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस सुपर फास्ट व बिदर-छत्रपती शिवाजी महाराज सुपर फास्ट एक्सप्रेस या गाडयांना 2ए व 3ए करीता वाढीव डब्यांची मागणी पुणे येथे सोलापूर रेल्वे विभागाच्या  झालेल्या बैठकी दरम्यान खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली होती. या बैठकीस प्रामुख्याने श्री. ए. के. गुप्ता (महाप्रबंधक) मध्य रेल्वे यांच्याकडे केली होती व सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केंद्रीय रेल्वे मंत्री मा.ना.श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे केला होता. वरील दोन्ही रेल्वे गाडयांना अतिरीक्त डब्‌बे जोडले जाणार असल्याचे पत्र रेल्वे विभागाकडून प्रकाशित करण्यात आले आहे.


बिदर-छत्रपती शिवाजी महाराज सुपर फास्ट एक्सप्रेस (गाडी नं. 22143 व 22144) व लातूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस सुपर फास्ट (गाडी नं. 22107 व 22108) या गाडयांना प्रवाश्यांची होणारी गैरसोय लक्षात घेवून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वेच्या वाढीव 2A व 3A  डब्यांची मागणी लावून धरत लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान विविध आयुधाच्या माध्यमातून आवाज उठविला होता. याचाच परीणाम म्हणून रेल्वे विभागाकडून दि.21/11/2024 रोजीच्या पत्राव्दारे अतिरीक्त डब्बे दि. 01/12/2024 पासून जोडत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे धाराशिव व लातूर जिल्हयातील रेल्वे प्रवाश्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 


 
Top