परांडा (प्रतिनिधी ) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे वीर कराटे मार्शल आर्ट्स अकॅडमी व महाविद्यालयातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युवती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सुनील जाधव , प्रमुख पाहुणे व प्रशिक्षक म्हणून परंडा तालुका मुख्य प्रशिक्षक पांडुरंग ठोसर , संतोष शिंदे हे प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित होते.

 यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ सुनील जाधव उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने ,सांस्कृतिक विभाग प्रमुखडॉ शहाजी चंदनशिवे , प्रा विजय जाधव ,टीव्ही नाईन (9) चे पत्रकार शितल कुमार मोठे उपस्थित होते. यावेळी कनिष्ठ वरीष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युवती मंचच्या सर्व पदाधिकारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी पांडुरंग ठोसर व संतोष शिंदे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे संरक्षण कसे करावे या संदर्भात विविध प्रकारच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले.एखादी घटना घडल्यानंतर त्यास सामोरे कसे जावे याची प्रात्यक्षिक करून दाखविले . यावेळी कराटे नॉन चॉप स्टिक रोड फाईट फिटनेस जिम्नॅस्टिक अशा विविध खेळा संदर्भात  माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमास अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले.तर प्रा विजय जाधव यांनी आभार मानले.

 
Top