धाराशिव (प्रतिनिधी)-येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सह समन्वयक डॉ.संदीप देशमुख यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्या धाराशिव जिल्हा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. संदीप देशमुख हे महाविद्यालयात रसायनशास्त्राचे विभाग प्रमुख असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून यशस्वीपणे काम पाहत आहेत. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षकांची पतसंस्था या पतसंस्थेचे ते संचालक म्हणून देखील ते कार्यरत आहेत. डॉ.संदीप देशमुख यांचे अनेक विद्यार्थी विदेशामध्ये पीएच.डी.चे संशोधन फेलोशिप सह करत आहेत. यासाठी डॉ.संदीप देशमुख यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे , सचिव प्राचार्य सौ. शुभांगी गावडे , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे , मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले.सदर सत्कार समारंभ प्रसंगी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते , विद्यार्थी , प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

 
Top