धाराशिव (प्रतिनिधी)- संस्कार भारती देवगिरी प्रांताच्या प्रदेश कार्यकारणीवर सहमंत्रीपदी डॉ. सतीश महामुनी, आणि प्रदेश दृश्यकला विभाग संयोजक म्हणून शेषनाथ वाघ, छायाचित्रण सहसंयोजक पद्माकर मोकाशे यांची निवड अखिल भारतीय महामंत्री आशितोष अडोणी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केली.

छत्रपती संभाजीनगर येथील लालबहादूर शास्त्री सभागृहात देवगिरी प्रांत संस्कार भारतीची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली.  यासाठी पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे व अखिल भारतीय महामंत्री आशुतोष अडोणी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रांताच्या अध्यक्षा प्रा. स्नेहलताई पाठक, प्रांत महामंत्री डॉ . जगदीश देशमुख यांच्यासह मराठवाडा आणि खानदेश मधील सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या निमित्ताने देवगिरी प्रांताचे पुढील तीन वर्षासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये धाराशिव जिल्ह्यामधून डॉ. सतीश महामुनी, शेषनाथ वाघ, आणि पद्माकर मोकाशे यांना संधी मिळाली आहे. या निवडीबद्दल प्रांतध्यक्षा स्नेहलताई पाठक, प्रांत महामंत्री डॉ जगदीश देशमुख, माजी प्रांत महामंत्री सुधीर कुलकर्णी, धाराशिव जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर बन्साळी यांनी अभिनंदन केले आहे. या बैठकीमध्ये जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन, संस्कार भारतीचे तुळजापूर अध्यक्ष प्रफुल्ल कुमार शेटे यांच्या मातोश्री सुहासिनी शेटे यांच्या निधन झाल्याबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.

तुळजापूर येथील संस्कार भारती चे संस्थापक पदाधिकारी डॉ. सतीश महामुनी १९९८ पासून कार्यरत आहेत. तुळजापूर समिती निमंत्रक, जिल्हा संघटन मंत्री, लातूर विभाग प्रमुख, प्रदेश लोककला प्रमुख, अशा विविध पदावर २६ वर्षापासून कार्यरत आहेत.२०१४ ते २०१९ या काळात तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या राज्य सांस्कृतिक महासंचालनाकडून दिल्या जाणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीचे सदस्य म्हणून काम केलेले आहे. यामधील शेषनाथ वाघ हे देखील यापूर्वी चित्रकला विभाग प्रमुख म्हणून प्रदेश पातळीवर कार्यरत होते व पद्माकर मोकाशे हे तुळजापूर समितीचे ७ वर्षे अध्यक्ष आणि २ वर्षापासून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

 
Top