तुळजापूर (प्रतिनिधी)-शहरातील पापनाशनगर मधील श्री स्वामी समर्थ स्क्रँप भंगार दुकानाला सोमवार दि. २३रोजी सकाळी अचानक आग लागुन यात संपुर्ण दुकान जळुन जावुन यात सुमारे सहा ते सात लाख रुपये नुकसान झाल्याची माहीती दुकान मालकाने दिली.सदरील आगीची घटना सकाळी ७.३५ वा घडली . या बाबतीत अधिक माहीती अशी कि पापनाश नगर भागात दिपक महादेव रेणके यांचे स्क्रँप चे दुकान असुन सकाळी अचानक ७.३५वा आग लागली. आत उच्च दर्जाचे प्लास्टिक असल्याने लगोलग वेगाने वाढत गेली यात संपुर्णस्क्रँप दुकानातील माल जळुन खाक होवुन प्लास्टिक विविध साहित्य जळुन खाक होवुन सात ते आठ लाख रुपयाचे नुकसान झाले. नंतर अग्निशमन दलाचा गाडीने आग विझवली.