धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र सरकार कडून कांदा पिकावर 20 टक्के निर्यात शुल्क आकारल्यामुळे भारतातून होणारी कांद्याची निर्यात मंदावली आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान व केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

खरीप हंगाम 2024 मध्ये महाराष्ट्रातील नाशिक सह धाराशिव व सोलापूर जिल्हयात खरीप, लेट खरीप कांदा पिकाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांना आर्थीक उत्पन्न देणारे प्रमुख बागायती पिकापैकी कांदा हे महत्वाचे पिक आहे. गतवर्षी लोकसभेच्या निवडणुका डोळयासमोर ठेवून सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्यावरती 20 टक्के एवढे निर्यात शुल्क लावले होते. यामुळे कांदा निर्यात न होता देशांतर्गत बाजार पेठेत कांदा विक्री कमी दराने झाली. चालू वर्षामध्ये कांदा पिकाचे उत्पादन चांगले मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठया  प्रमाणात झालेल्या पावसात सदर पिक वाचविले.  त्यातून चांगले उत्पन्न मिळण्याची अशा शेतकऱ्यांना होती.

सध्या कांदा पिकाचा हंगाम सुरु असून खरीप हंगामातील कांदा विक्रीयोग्य झाल्याकारणाने शेतकऱ्यांनी कांदा बाजार पेठेत पाठविण्यास सुरुवात केली आहे. लासलगाव व सोलापूर येथे बाजारपेठेत कांद्याचे आवक मोठया प्रमाणात सुरु झाली असून यामुळे कांद्याचे दर मागील 15 दिवसाच्या तुलनेत खालच्या पातळीवरती आले आहे. लेट खरीप व भविष्यातील रब्बी हंगामातील कांदा बाजार पेठेत उपलब्ध झाल्यास कांद्यावर केलेला खर्च देखील निघणे अवघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कांद्यावरील 20 टक्के निर्यात दर हटवल्यास श्रीलंका, बांगलादेश व अन्य देशांकडून मोठया प्रमाणात भारतीय कांद्याची खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपेक्षीत दर मिळेल. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे व्यथा लक्षात घेता केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान व केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राव्दारे 20 टक्के निर्यात दर हटवून तात्काळ निर्यात सुरु करणेबाबत पत्राव्दारे विनंती केली आहे.


 
Top