तुळजापूर -

येथील श्री.तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप कशी करावी. तसेच संगणक क्षेत्रातील विविध नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. पुणे येथील वैभवी अशोक पौळ  यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले. 


यावेळी विभागप्रमुख प्रा. डी.जे. वाघमारे उपस्थित होते . वैभवी पौळ  यांनी  इंटर्नशिपचे महत्व, तसेच संगणक क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नितीन कुलकर्णी, महेश नवगिरे, प्रा.डी.डी.रणखांब यांनी काम पाहिले.

 
Top