धाराशिव - डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल येथील एस.पी.पॉलिटेक्निक मध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी प्रेमकुमार राजाराम गुंड यांची भारतीय रेल्वेमध्ये टेक्निकल विभागात कॅरेज अँड वॅगनपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचा एस. पी.पॉलिटेक्निकच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना गुंड यांनी सांगितले की,कॉलेजमध्ये चालू असलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्राचा फायदा झाला आहे. इतर विदयार्थ्यांनी ही त्याचा फायदा घ्यावा.या यशाबद्दल धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील प्राचार्य अमरसिंह कवडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.