धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद 55 गट व पंचायत समितीच्या 110 गणासाठी 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक झाली होती. या निवडणुकीची मतमोजणी सोमवार दि. 9फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांच्या ठिकाणी सकाळी 9.30 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यात एकूण 65.22 टक्के इतके मतदान झाले आहे. भूममध्ये 71.66 टक्के, वाशीमध्ये 69.60 टक्के, कळंब 66.69 टक्के, धाराशिव 63.73 टक्के, परंडामध्ये 71.62 टक्के, तुळजापूर 64.72 टक्के, लोहारा 57.32 टक्के, उमरगा 61.18 टक्के याप्रमाणे मतदान झाले आहे. या निवडणुकीची मतमोजणी तालुकावाईज होत आहे. त्यामुळे निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे.
धाराशिव तालुक्यात 12 गट व 24 गण यासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी भाई उध्दवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी 24 टेबल आहेत. तर तुळजापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 8 गट व पंचायत समितीचे 18 गण यासाठी झालेल्या निवडणुकीतील मतमोजणी तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे 14 टेबलावर होणार आहे. तर उमरगा येथे जिल्हा परिषद 9 गट व पंचायत समिती 18 गणासाठी झालेल्या निवडणुकीतील मतमोजणी अंतुबळी पतंगे सांस्कृतिक सभागृह येथे 18 टेबलवर होणार आहे. तर लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद 4 व पंचायत समिती 8 गणासाठी झालेल्या निवडणुकीतील मतमोजणी लोहारा तहसील कार्यालय येथे 10 टेबलावर होणार आहे.
तर कळंब तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 8 गट व पंचायत समितीचे 16 गण यासाठी झालेल्या निवडणुकीतील मतमोजणी श्री संत गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथे 15 टेबलवर होणार आहे. तर वाशी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 3 गट व पंचायत समितीच्या 6 गणासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालय वाशी येथे 6 टेबलावर होणार आहे. तर भूम तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 गट व पंचायत समितीच्या 10 गण यासाठी झालेल्या निवडणुकीतील मतमोजणी अनुः जाती मुलांची निवासी शाळा गोलेगाव येथे 14 टेबलावर होणार आहे. तर परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 गट व पंचायत समितीच्या 10 गणासाठी झालेल्या निवडणुकीतील मतमोजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह करमाळा रोड, परंडा येथे 14 टेबलावर होणार आहे.
.jpeg)
