धाराशिव- शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि धोरणात्मक सुधारणा करण्यासाठी एनसीईआरटी या राष्ट्रीय शैक्षणिक संस्थेअंतर्गत नवीन शैक्षणिक धोरण - २०२० नुसार स्थापन झालेल्या परख या संस्थेमार्फत संपूर्ण देशामध्ये ७८२ जिल्ह्यांमधील ८८ हजारपेक्षा जास्त निवडक शाळांतील २३ लक्षपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे परख राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण २०२४ चे आयोजन ४ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.


जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधीत तिसरीच्या ४३, सहावीच्या ४२ व नववीच्या ४९ अशा एकूण -१२० शाळांमधील १३४ वर्गातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे.या सर्वेक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल. इयत्ता ३ री आणि ६ वी साठी भाषा, गणित आणि पर्यावरण अभ्यास हे विषय तर इयत्ता ९ वी साठी भाषा, गणित,सामाजिक शास्त्र आणि विज्ञान विषयांसाठी सर्वेक्षण चाचणी होणार आहे.


सर्वेक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धाराशिवचे डॉ. प्राचार्य दयानंद जटनुरे व  शिक्षणाधिकारी,(प्राथमिक) अशोक पाटील हे जिल्हा समन्वयक व संस्थेतील मूल्यमापन विभाग प्रमुख प्रा.डॉ.शोभा मिसाळ व प्रा.श्री.मिलिंद अघोर हे जिल्हा सहाय्यक समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

 
Top