धाराशिव :- भारतीय संविधान दिन व संविधान स्विकृतीला ७५ वर्ष पुर्ण झाली, संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधान जनजागरण रॅली काढण्यात आली होती,रॅलीत ओबिसी महासंघाच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला, ओबिसी महासंघाचे महादेव माळी,सचिन चौधरी,सुधिर कोळगे,शुभम मराठे,जितेश होळकर व इतरांच्या वतीने जिजाऊ चौकात रॅलीस सुरुवात होण्यापुर्वी बिस्किटे वाटप करण्यात आली,या रॅलीत ग्रामीण भागातील नागरिक देखील सामिल झाले होते.समितीच्या वतीने एम डी देशमुख,अब्दुल लतिफ, गणेश वाघमारे,बाबासाहेब गुळीग,शेख रऊफ,युसुफ सय्यद यांनी संविधान उद्देशिका व विश्लेषण पत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.तर अॅड.अजय वाघाळे,अमर आगळे यांनी आभार मानले