तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ  तुळजापूर  शहरातील  मंदीर कडे जाणाऱ्या रस्त्यावर रहदारिस धोकादायक रित्या वाहने उभे करणाऱ्या पाच चारचाकी गाडा चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. माञ रस्त्यावर दुकाने मांडुन भाविकांना मार्गक्रमण करणाऱ्या रस्तावर दुकाने थाटणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने आश्चर्यव्यक्त केले जात आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात मंदीराकडे जाणाऱ्या महाद्वार समोरील पायऱ्यावर मोठे अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण दुकानाचा बाजूला लाखो रुपये मोजुन भाडे देणारे दुकानदार आहेत. माञ रस्त्यावर फुकट दुकाने थाटुन बसलेल्यांना या कारवाईतुन अभय दिल्याने यात अर्थिक लाभ प्रकार तर घडला नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे. तुळजापूर पोलिस ठाण्याच्या पथकाने शुक्रवार  दि.6 डिसेंबर रोजी अकुंश बनवारीलाल तर मोहित समरपाल कुमार, सचिन राकेश कुमार, रोहीत उमेशचंद कुमार, अजयकुमार नथुराम यादव यांच्या चारचाकी व्यवसायिक गाड्यावर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायक रित्या उभे करुन भा.दं.सं.कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द तुळजापूर पोलिस ठाणे येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवले आहेत.


 
Top