कळंब (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना प्राचीन शिल्पांची माहिती व्हावी, यासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्या वतीने फिरते म्युझियम सुरू करण्यात आले आहे. हे फिरते म्युझियम दिनांक 03 व दिनांक 05 तारखेला कळंब शहरामध्ये  सकाळी मैदानावर पोहोचले. 

यावेळी शहरातील विद्याभवन हायस्कूल , सावित्रीबाई फुले विद्यालय, कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल तसेच के.एन. माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालय शिराढोण, ओजस प्रशाला शिराढोण ,सावित्रीबाई फुले कन्या हायस्कुल शिराढोण.,जि.प. उर्दु प्रा.शा. शिराढोण, के.एन उर्दु प्राथमिक शाळा शिराढोण  प्रशालेसह अन्य शाळांतील विद्यार्थ्यांनी आत जाऊन प्राची शिल्पे पाहिली. यासाठी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, सचिव अशोक काटे प्रोजेक्ट चेरमन रोटे,रवी नरहिरे, रोटे निखिल भडंगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top