तेर (प्रतिनिधी)- बायफ बीआयएसएलडी व कोटक महिंद्रा बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमानातुन व पशुसंवर्धन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तेर येथे 26 गायी व म्हशींची तपासणी करण्यात आली. यामध्ये जंतनाशक, गोचीड निर्मूलन तसेच गाभण जनावरांची तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमामध्ये सर्व पशुंना मोफत उपचार देण्यात आले. यावेळी बायफ चे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी डॉ.संतोष एकशिंगे यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले. बायफ संस्थे मार्फत चालण्यात येणाऱ्या प्रकल्प मार्फत कोणत्या योजनेतून पशुपालकांना कोणते लाभ मिळणार आहेत या बद्दल माहिती सांगितली व पशुपालकांना लिंग निश्चित विर्य (सॉर्टेड सिमेन) याचा उपयोग करुन पशुपालकांचे उत्पन्न कशाप्रकारे वाढेल याबद्दल माहिती देण्यात आली. पशुपालकांसाठी चारा बियाणे खनिज मिश्रण मोफत बियाणे उपलब्ध असलेल्या बाबतही माहिती सांगण्यात आली. पशुपालकांचे जनावर गाभण न जाण्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी अशाप्रकारे वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले या मध्ये बायफ संस्थे मार्फत व पशुसंवर्धन विभाग यांच्या मार्फत सर्व औषध उपचार व खनिज मिश्रण पशूपालकांना मोफत देण्यात आले. यावेळी बायफ चे जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ.अतुल मुळे उपस्थित होते.या कार्यक्रमास बायफचे कर्मचारी कृत्रीम रेतन तंत्रज्ञ शितेश तांबवे व तेर येथील पशू वैदकीय दवाखाना येथील कर्मचारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमास पशुपालकांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला.