तेर (प्रतिनिधी)- सामान्य ज्ञान स्पर्धा काळाची गरज आहे असे प्रतिपादन महीला गट प्रेरीका पूजा चव्हाण यांनी केले.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे अकरावी व बारावीच्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांसाठी आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पूजा चव्हाण बोलत होत्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रात संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. के .बेदरे  होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून तेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संतोष गायकवाड, प्रा. प्रदीप कोकाटे ,प्रा.दयानंद फंड, प्रा.सतीश भालेराव,प्रा.संदिप पाटील ,प्रा. जयश्री भक्ते, प्रा.सुवर्णा घुटे  यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक नरहरी बडवे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.संदिप पाटील यांनी केले.अभार प्रा.सतिश भालेराव यांनी मानले.


 
Top