तेर (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात समावेश निश्चित करण्यात येणार असा विश्वास तेरकरांना वाटप असल्याने तेरकरांचे लक्ष लाल दिव्याकडे लागले आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर येथील रहिवासी व तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आ.राणाजगजितसिंह पाटील यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यात येईल अशी अपेक्षा असून यामुळे तेरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
धाराशिव जिल्हाचे विकासाचे व्हिजन असणारा व शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.आ.राणाजगजितसिंह पाटील अत्यंत अभ्यासू,हाती घेतलेले काम पाठपुरावा करून पूर्ण करण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न, सार्वजनिक कामांना प्राधान्य, गोरगरीबाविषयी असलेली तळमळ तसेच भारतीय जनता पार्टीचे वरीष्ठ नेते व विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे स्नेहाचे असलेले संबंध व राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा अनुभव असल्याने व मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने आ.राणाजगजितसिंह पाटील यांचा राज्य मंत्रिमंडळात निश्चितपणे समावेश होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे तेरकरांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.2009 नंतर पुन्हा तेरला लाल दिवा मिळणार असा आशावाद भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.त्यामुळे तेरकरांचे लक्ष लाल दिव्याकडे लागले आहे.