धाराशिव (प्रतिनिधी)-  शेरे गल्ली ता.कळंब जि.धाराशिव येथील राणी शंकर काळे, वय 36 वर्षे, यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, द्रव्य सेवा कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारी व्यक्ती, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याचा अधिनियम 1981 (एमपीडीए) सुधारणा 2015 कलम- 3  चे उल्लंघन केल्याने स्थानबध्द बाबतची कारवाई करणे करिता मा. पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांनी त्या महिलेस स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव  जिल्हाधिकारी यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास जिल्हाधिकारी यांची मंजूरी मिळल्याने  विरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर,  पोलीस अधीक्षक सजंय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन व  उपविभागीय पोलीस अधिकारी कळंब संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक  वासुदेव मोरे, पोलीस ठाणे कळंबचे पोलीस निरीक्षक रवि सानप, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस हावलदार अश्विन जाधव, जगदाळे यांच्या पथकाने उपरोक्त महिलेस ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस्तव छत्रपती संभाजी नगर येथील हर्सुल मध्यवर्ती कारागृह मध्ये जमा करण्यात आले आहे.

 
Top