तुळजापूर (प्रतिनिधी) -  श्रीतुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शाकंभरी नवराञ उत्सव पुर्वीची मंचकी निद्रेस मंगळवार दि. 31 डिसेंबर रोजी  रात्री आरंभ  होणार  आहे. श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञ उत्सव हा दि. 7 जानेवारी ते 14 जानेवारी 2025 दरम्यान संपन्न होणार आहे. तत्पुर्वीच्या मंचकी निद्रेस मंगळवार दि. 31 डिसेंबर रोजी राञी आरंभ होणार आहे. 

मंगळवारी संध्याकाळचे अभिषेक पुजेची घाट सायंकाळी  5.30 वाजता होऊन अभिषेक पुजा सायंकाळी 7 वाजेपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर मेण काढणे व इतर धार्मिक विधी 7.30 वाजेपर्यंत पूर्ण होऊन 7.30 ते 8 वाजेपर्यंत श्री देविजींची मंचकी निद्रा हा धार्मिक विधी पार पडणार आहे. श्रीतुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रा काळात देविजींची मुळमुर्ती शयनकक्षात चांदीच्या सिंहासनावर निद्रेस्त केली जाते. त्यामुळे या मंचकीनिद्रा कालावधीत भाविकांची देवीदर्शनार्थ संख्या रोडवलेली असते. यंदा नववर्ष प्रथम दिनी देविजींची मुळमुख्य मुर्ती निद्रस्त अवस्थेत असल्याने देविजींचे निद्रस्त अवस्थेतील देवीमुर्तीचे दर्शन घेवुन भाविकांना नववर्षाचा आरंभ करावा लागणार आहे. तरी यांची सर्वांनी नोंद घ्यावी. असे आवाहन तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर  यांनी केले आहे.

 
Top