तुळजापूर (प्रतिनिधी)- दिगंबर जैन अतिशय क्षेत्र सावरगांव, ता. तुळजापूर येथील वार्षिक यात्रा दि. 26 डिसेंबर 24 रोजी संपन्न झाली. यात्रेनिमित्त कुंभमेळा, मूलनाक श्री 1008 पार्श्वनाथ भगवंतास अभिषेक, पालखी मिरवणूक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. ब्राझील येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाची विद्यार्थीनी डॉ. मारिया विटोरिया सनतोस ही सावरगांव येथील वार्षिक यात्रेत सहभागी झाली. 

डॉ. मारिया हिची रोटरी इंटरनॅशनल स्टडी एक्सचेंज योजनेअंतर्गत सोलापूर येथील अश्विनी सहकारी रुग्णालय येथे अभ्यासक विद्यार्थीनी म्हणून निवड झाली आहे. यात्रे मधील सहभागानंतर तिने भारतीय संस्कृती ही पुरातन व मनःशांती देणारी असून, या क्षेत्र दर्शनाने खूप मनःशांती लाभली अशी भावना व्यक्त केली.  यात्रेस बहुसंख्येने भाविक उपस्थित होते. भाविकांची निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था विश्वस्त मंडळाने केली होती.

 
Top