नळदुर्ग (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या मुखातुन केलेल्या आक्षेपार्ह विधान हे अमित शहा यांना शोभत नाही. अशा मंत्र्यांनी खुर्चीवर न बसता त्यांनी राजीनामा द्यावा. यांच्या निषेधार्थ आणि परभणी येथील भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित पोलिस प्रशासनाच्या विरूद्ध नळदुर्ग आणि परिसरातील भिम सैनिकांच्यावतीने कडकडीत नळदुर्ग बंद करून  मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

अमित शहा यांच्या या आक्षेपार्ह विधानचा जाहीर निषेध व परभणी येथील शहीद भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू कारणीभूत असलेल्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात नळदुर्ग येथे भिमसैनिकांच्या वतीने कडकडीत नळदुर्ग बंद करून निदर्शने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी व्यापारी मंडळाच्या पदाधिकारी यांनी सहकार्य केले. 

या प्रसंगी अमित शहा यांनी देशाची माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पन्नास लाख रुपये देऊन पुनर्वसन करावे, सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कायमस्वरूपी निलंबित करुन त्यांच्याशर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आदी सह विविध मागण्यांचे निवेदन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना देण्यात आले.

यावेळी सुनील बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, दुर्वास बनसोडे अजयकुमार बागडे, योगेश सुरवसे , तानाजी कदम , एस.के.गायकवाड, कैलास गवळी गुरुजी, अरूण लोखंडे,, सचिन बनसोडे, महिला कार्यकर्त्यां कल्पनाताई गायकवाड, उषा शिंदे, पिंकी भोसले, स्नेहा झेंडार सह नळदुर्ग व परिसरातील शेकडो भिमसैनिक उपस्थित होते.

 
Top