तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काक्रंबा परिसरात असणाऱ्या अनेक गावात अवैध धंदे बरोबरच गुंडगिरी दहशत निर्माण करणे प्रकरणात मोठी वाढ झाला आहे. या भागातील जवळगा (मे.), प्रकरणे तर राज्यात चर्चित ठरले आहे. या पार्श्वभूमीवर जवळगा मेसाई, बारूळ सह परिसरातील गावांमध्ये रात्री पोलीस पेट्रोलिंग करण्याच्या सुचना  आमदार राणाजगजितसिंह  पाटील यांनी पोलिसांना दिल्या. 

जवळगा मेसाई ता. तुळजापूर येथे काही दिवसापूर्वी पवनचक्की कंपनीच्या लोकांनी बाहेरील व्यक्ती आणून शेतकऱ्यांना दमदाटी करण्याची घटना घडली होती. तर दि. 26/12/2024 रोजी येथील सरपंचावर हल्ला झाला आहे. त्याचप्रमाणे जवळगा मेसाई व बारूळ भागात चोरीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात घडत आहेत. रात्रीच्या वेळी शेतमाल, अवजारे आणि जनावरांची चोरी होण्याचे प्रकार या भागात घडत आहेत. या घटनांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या गावांसह परिसरातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी नियमित पोलिस पेट्रोलिंग करणेबाबत संबंधितांना आदेशीत करावे, अशी  सुचना  पोलीस अधिक्षक पोलिस अधिक्षक कार्यालय धाराशिव यांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्र  देवुन दिल्या आहेत.

 
Top