धाराशिव (प्रतिनिधी)-  हिंगोली जिल्ह्यातील भाटसांगवी येथील महिला प्रवास करतांना चुकुन धाराशिव येथे उतरली तर तिचे दोन महिण्याचे बाळ आजारी असल्याने दि.07 फेब्रुवारी रोजी दगावले असता दक्षता समिती सदस्य आशा कांबळे यांनी पुढाकार घेत सामाजिक क्षेत्रातील मान्यवराकडुन त्या बाळाचा दफन विधी त्याची आई,महिला कुटुंबाच्या संमतीने व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव आणि पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने कपिलधरा स्मशानभुमीत करण्यात आला होता, मातोश्री वृद्धाश्रम येथे त्या महिलेची राहण्याची सोय करण्यात आली,आज रोजी तिच्या गावी सोडण्यासाठी दक्षता समिती सदस्य आशाताई कांबळे व त्यांचे सहकारी हिंगोली जिल्ह्यातील भट सांगवी येथे सोडण्यासाठी निघाले असता शहर पोलीस ठाण्यात शुभेच्छा देत त्यांना रवाना करण्यात आले,यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले, यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील वैद्यकीय सामाजिक अधिक्षक नवनाथ सरवदे,महेश अटकळ,सुरक्षा समिती व रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतीफ,सदस्य गणेश वाघमारे,आरोग्य मित्र रौफ शेख,चांद शेख,तर ॲड.अश्विनी सोनटक्के,अनुजा पानसरे, मैना दाभाडे सह पोलीस बांधव उपस्थित होते.

 
Top