धाराशिव (प्रतिनिधी)- परभणी येथील संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीची एका समाजकंटकाने तोडफोड केली. ही बाब अतिशय निंदनीय आहे,कृत्य करणाऱ्या समाजकंटकास अटक केली असली तरी त्याच्या पाठीमागे कोण आहे. याचा शोध घेऊन सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटीची नेमणुक करुन त्या समाजकंटकांना देशद्रोही ठरवुन कडक कारवाई केली पाहिजे. 

समाजकंटक मनोरुग्ण आहे म्हणता तर तो असे कृत्य कसा काय करु शकतो की भारतीय संविधान प्रतिकृती भक्कमपणे लावली असतांना तो द्वेषाची भावना बाळगुन तोडफोड करतो. सध्या भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सव वर्ष चालु असुन देशभरात संविधानाचा गौरव होत असतांना त्याच संविधानाविषयी अशी घटना घडणे सर्व भारतीयांसाठी निंदणीय बाब आहे. याचा आम्ही निषेध करतो. परभणी येथील घडलेल्या घटनेची एसआयटी कडुन सखोल चौकशी करुन जे कोणी त्या समाज कंटकाच्या सोबत आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना देशद्रोही कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी सिध्दार्थ बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत, गणेश वाघमारे, बाबासाहेब बनसोडे, धनंजय वाघमारे, अंकुश उबाळे, संजय गजधने, संग्राम बनसोडे, प्रविण जगताप, बलभीम कांबळे, संपतराव शिंदे, रमेश कांबळे, स्वराज जानराव, प्रा.झेंडे, बापु कुचेकर, स्वामीनाथ चंदनशिवे, सरवदे गुरुजी, मुकुंद बनसोडे सह इतर उपस्थित होते.

 
Top