तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या फिरते वस्तू संग्रहालयातील प्राचीन शिल्प पाहाण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात फिरते वस्तू संग्रहालयाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के. बेदरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी फिरते वस्तू संग्रहालयाचे शिक्षण सुलभक चिन्मय वैशाली, सहाय्यक शिक्षण सुलभक काश्यपी राणे,त्रुतूजा काळे, सहाय्यक सुलभक देवेश पाले, ओंकार डोंगरकर,पर्यवेक्षक एस .एस. पाटील, एस .एस. बळवंतराव, नवनाथ पांचाळ ,एस.यू.गोडगे उपस्थित होते.यावेळी शिक्षण सुलभक चिन्मय वैशाली यांनी फिरते वस्तू संग्रहालयाचा उद्देश काय आहे याची सविस्तर माहिती सांगितली.यावेळी 14 व्या शतकातील युरोपमध्ये छापील चित्राची जगामध्ये पहीली सुरूवात झाली.त्याचे प्रात्यक्षिक उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना दाखविण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी,विद्यार्थीनी, नागरिक यानी फिरते वस्तू संग्रहालयातील प्राचीन शिल्प पाहाण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी अविनाश राठोड,किसन काळे,दुर्गेश नान्नजकर,.सविता बागडे,मेघा राऊत,भाग्यश्री बिराजदार,विवेक उबाळे,सलमानखा पठाण,गिरीश चवरे उपस्थित होते.