कळंब (प्रतिनिधी)- येथील भारत वाचनालय येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम दि. 1 ते 15 जानेवारी या कालावधीत विविध उपक्रम घेवून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रंथालयाचे संचालक प्रा. श्रीधर भवर यांनी दिली.
शासन परिपत्रकाप्रमाणे दि. 29 डिसेंबर ते 16 जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून दि. 26 जानेवारी रोजी विजेत्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र व बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. या उपक्रमात दोन दिवस ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच वाचनकौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून लेखक व विद्यार्थी यांच्यात वाचन-संवाद कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी ग्रंथवाचन, परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्यान इत्यादी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यानंतर शालेय विद्यार्थांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमात विद्यार्थी, युवक, युवती, महिला, जेष्ठ नागरीक यांनी सहभागी व्हावे वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी आपले योगदान सहभागाच्या माध्यमातून द्यावे, असे आवाहन संस्थापक श्री. श्रीधर (बाबा) भवर, संचालक मंडळ व ग्रंथालय कर्मचारी यांनी केले आहे.